आजचा प्रश्न
प्रश्न- कंडोम कशापासून व कसे बनवितात ?
उत्तर- विशिष्ट प्रकारच्या झाडाच्या चिकापासून कंडोम बनविले जाते. या चिकाचे एकावर एक असे थंड रासायनिक प्रक्रियेचा वापर करून थर दिले जातात. यामुळे जाडी योग्य असलेला व बिलकुल छिद्रे नसलेला, लवचिकता असलेला कंडोम तयार होतो. लैंगिक संबंधांवेळी घर्षणाने फाटू नये म्हणून वंगणयुक्त कंडोम तयार केले जातात. त्याची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीने तपासली जाते.
यामध्ये 'लिकेज' असेल तर ते बाद ठरवले जातात व उत्तम प्रतीचाच वंगणयुक्त कंडोम बाजारात उपलब्ध केला जातो. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासल्यावर प्रत्येक कंडोम पाकिटावर वंगणयुक्त व इलेक्ट्रॉनिक परीक्षण केले आहे की नाही याविषयी स्पष्ट उल्लेख केलेला असतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)