आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स करणे पूर्णपणे निषिद्ध कधी असते ?
उत्तर- सेक्स चांगला होण्यासाठी मन व शरीर निरोगी असले पाहिजे. त्याचबरोबर दोघांना त्याविषयी माहिती हवी आणि एकमेकांची संमती हवी.
खोकला, सर्दी, ताप, गॅस्ट्रो, स्त्रीमधे अंगावर पांढरे किंवा लाल जात असेल तर यामधे सेक्स करु नये. अपघात, शस्त्रक्रिया झाल्यावर करु नये. यातून शरीर पूर्ववत झाले तरी मन तयार असेल तर ठीक. संधीवात, दमा, कंबरदुखी, टी.बी, पूर्ण अंध, अपंग यांनी सेक्स पूर्ण बंद करणे गरजेचे नाही. फक्त डॉक्टरी सल्ला अपेक्षित आहे. नेमके इतर डॉक्टर्स यावर सल्ला देणे टाळतात. पेशंट्स पण लाजून विचारत नाहीत. नॉर्मल असताना पण निव्वळ लाजेखातर वा घाबरून लोक हार्ट ऑपरेशन नंतर सेक्स बंद करतात. इथे समुपदेशनाची गरज असते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)