आजचा प्रश्न

प्रश्न- मलविसर्जन करताना लिंगातून वीर्य पडते हा दोष आहे का ?
उत्तर- पेपर मधील जाहिरातींमधून या विषयी खूप गैरसमज आणि भीती पसरवली गेली आहे. झोपेत, हस्तमैथुन, सेक्स यामधे वीर्यपतन झाल्यावर लगेच लघवी केली तर लघवी बरोबर थोडे शुक्राणु, वीर्यचा अंश बाहेर येतो. शौच करताना काहीना कुंथावे लागते. अशावेळी आतील बाजूस सेमिनल वेसीकल, प्रोस्टेट ग्रंथी यावर दाब पडल्याने त्यातील स्त्राव हा बाहेर येतो. त्याला लोक वीर्य म्हणतात आणि काही रोग झाला असे समजून घाबरतात. प्रत्यक्षात हा काही आजार नाही त्यामुळे उपचाराचा सवाल नाही. गरज आहे ती मलविसर्जन योग्य होण्यासाठी औषध घेण्याची.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)