आजचा प्रश्न

प्रश्न- (Dotted Condom) डॉटेड कंडोमने खरेच स्त्रीला कामजीवनात फायदा होतो का ?
उत्तर- कंडोम कंपनीने डॉटेड कंडोम स्त्रीला सुख मिळण्याच्या उद्देशाने निर्माण केले आहेत. तशी जाहिरातही केली जाते. स्त्री योनीमार्गातील पहिले पाच सेंमी हे संवेदशील आहेत. योनीमार्गात पातळपणा आल्यावर कंडोमवरील उंचवटे हे योनीमार्गात घासले जातात व तिला आनंद मिळतो असे म्हटले जाते. प्रत्यक्षात पुरुषाने कामपूर्ती मिळवून देणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी जी स्पॉट उद्दीपन करणे व मुखमैथुन, हस्तमैथुन यातून स्त्रीला १००% कामपूर्ती मिळते. शिवाय, भारतातील डॉटेड कंडोमवर इतके डॉटस् नसतात. परदेशातील कंडोमवर मोठे डॉटस् असतात. त्यामुळे कदाचित स्त्रीला संभोगादरम्यान फरक जाणवत असावा एवढेच.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)