आजचा प्रश्न
प्रश्न- खायच्या पानातून काही औषधे नपुंसकत्वावर मिळतात का ? त्याचा फायदा होतो का ?
उत्तर- प्रत्यक्षात सिलडेनाफिल/टँडालाफिल यापैकी एका गोळीचा चुरा करून ती गोळी पानातून खावयास दिली जाते. पुरुषाला वाटते पानात काहीतरी 'औषध' आहे. अॅलोपॅथी औषधांचा असा गैरपद्धतीने वापर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गावागावात चाललेला आहे. असं पान 'सेक्स पॉवर' वाढवणारे आहे, असे सांगून दोनशे रुपयांना विकले जाते. लैंगिक समस्यांवर योग्य उपचार घेण्याऐवजी असे 'शॉर्टकट' घेतले तर ही फसवणूकच होणार.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)