आजचा प्रश्न
प्रश्न- स्पॅनिश फ्लाय हे सेक्स टॉनिक आहे का ?
उत्तर- कॅथरीस व्हेसीकॅटोरीया नावाच्या किड्यापासून बनवलेली ही पांढरी पावडर आहे. याच्या सेवनानंतर मूत्रमार्गाला सूज येते. तिथे आग आग होते. येथील रक्तपुरवठा वाढतो व शिश्न ताठ होते. परंतु संभोग घेणे सुखकर वाटत नाही. यामुळे बराच वेळ शिश्न ताठ राहते. पण हे नैसर्गिक नव्हे. याला प्रायापिझम (Prizpism) असे म्हणतात. या पावडरीची मात्रा जरा जास्त झाली तरी मृत्यू ओढवू शकतो. मुळात सेक्स टॉनिक घेण्याची कोणतीही गरज नसते. खरे सेक्स टॉनिक म्हणजे कामजीवनावरील शास्त्रीय माहिती असलेले पती-पत्नी हेच होय. तेव्हा उगाचच स्वतःहून अशी औषधे घेण्याच्या भानगडीत पडू नये.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)