आजचा प्रश्न
प्रश्न- हस्तमैथुन वा अतिसंभोग केल्याने लिंगात दोष निर्माण होतो. शीघ्रवीर्यपतन वा नपुंसकत्वाची समस्या निर्माण होते. अशाप्रकारे लिहिलेला एक लेख मध्यंतरी वाचला. ते खरे आहे का ?
उत्तर- कोणत्या स्वरूपाचे लेख छापावेत याचा निर्णय संपादक घेत असतात. मात्र बऱ्याच भोंदू डॉक्टरांचे लेख विविध मासिकांतून, दैनिकांतून येत असतात. तसेच भोंदू डॉक्टरांच्या जाहिरातीही येत असतात. याविरुद्ध समाजाच्या सर्व थरातून निषेध व्यक्त व्हायला हवा. अक्षरशः टाकाऊ अशी औषधे, स्तनाचा आकार वाढवण्यासाठीच्या क्रीम्स अशा अनेक जाहिरातीचे पेव फुटले आहे. समाज भोळा आहे म्हणूनच हे भोंदू डॉक्टर व बनावट औषधांचे उत्पादक त्याचा गैरफायदा घेतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्याने कोणताही रोग होत नाही. शीघ्रवीर्यपतन, नपुंसकत्व याची कारणे शोधून त्यानुसार उपचार करावे लागतात. अतिसंभोग वा अतिहस्तमैथुनाने कोणताही आजार होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे तथाकथित डॉक्टरांनी लिहिलेले लेख वाचून वाचकांनी काही समजुती मनात तयार करू नयेत. काही शंका व समस्या असल्यास तज्ज्ञ लैंगिकता विषयक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)