आजचा प्रश्न

प्रश्न- लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे समलिंगी असतात का ?
उत्तर- सर्वेक्षण असे सांगते की, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे बऱ्याच वेळा मुलाचे ओळखीचे, नातलग असतात. समलिंगी पुरुष हा विकृत, गुन्हेगार नसतो. तसेच स्त्री देखील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करू शकते. लहान मुले कधीही लैंगिक अत्याचारांचे शिकार होऊ शकतात. त्यामुळे प्रेमाचा स्पर्श आणि वासनेचा स्पर्श यांतील फरक पालकांनी मुलांना समजावून सांगावे. म्हणजे मुले सतर्क राहतील.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)