आजचा प्रश्न
प्रश्न- खरे लैंगिक समस्यातज्ञ कसे ओळखावे ?
उत्तर-
प्रत्येक पेशंटला डॉक्टरांचे शिक्षण, पदवी जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. तसे त्या डॉक्टरांना स्पष्ट विचारावे. शिक्षण कोठे घेतले, सर्टिफिकेट्स इ. गोष्टी दाखवण्यास खरे डॉक्टर्स कधीच नकार देणार नाहीत. खोटे डॉक्टर चिडतील, घाबरतील, बोलताना अडखळतील, विविध कारणे सांगून विषय टाळतील.

खरे डॉक्टर्स स्वतःच्या प्रॅक्टिससाठी स्वतंत्र दवाखाना सुरू करतात. हॉटेलमध्ये कधीच तपासणार नाहीत. दुसऱ्या गावी व्हिजिटसाठी गेले तरीही तेथील मोठ्या हॉस्पिटलमध्येच पेशंट्सना भेटतील. स्वतःच्या दवाखान्याची वर्तमानपत्रातून रोज जाहिरात देऊ शकत नाहीत.
लैंगिक समस्यांचे मूळ कारण शोधून काढण्यासाठी जवळ जवळ एक तास पेशंट्सला देतात. गरज पडली तरच रक्त, लघवीची तपासणी तसेच इतर अल्ट्रासोनोग्राफी, डॉप्लर तपासणी करावी लागते. प्रत्येक पेशंट्सला या सर्व तपासणींची गरज नाही, हे लक्षात ठेवा.
खरा डॉक्टर बऱ्याचशा लैंगिक समस्यांवर गोळ्यांचा अतिशय कमी वापर करतो व 'तंत्रावर' जास्त भर देतो. भोंदू डॉक्टर पेशंट्सच्या मनात चुकीचा समज रुजवत असतात की, सर्व लैंगिक समस्यांवर औषधी उपचारच आहे. त्यामुळे उपयोग न होणारे औषध हजारो रुपयांनी विकण्याची त्यांना चांगलीच संधी मिळते. इथेच पेशंट फसतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)