आजचा प्रश्न
प्रश्न- मी माझ्या पत्नीबरोबर संभोग करताना कंडोम वापरतो, परंतु कंडोम वापरताना ताठरता कमी येते असे का ?
उत्तर- कंडोम हे पुरुषांनी वापरताना स्वतःशेजारी ठेवायचे असते. बऱ्याचवेळा प्रणयाराधन करताना ताठरता चांगली येते, परंतु कंडोम शयनगृहात कॉटवर/बेडवर न ठेवता दुसरीकडे ठेवला जातो. तो शोधून लावेपर्यंत वेळ गेला की शिश्नाची संवेदना कमी होते व ताठरता कमी येते. यात घाबरण्यासारखे काही नाही. कोणत्या औषधाची गरज नाही. कंडोम वापरताना तुमच्या शिश्नाला, अंगाला कामुक स्पर्श करत राहण्यास पत्नीस सांगावे म्हणजे ताठरता टिकून राहील.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)