आजचा प्रश्न
प्रश्न- माझ्या लग्नानंतर पहिल्या रात्री माझी मासिक पाळी सुरू झाली. चार दिवसांनंतर आम्ही संबंध ठेवला. प्रथम संभोग करताना कोणता त्रास झाला नाही किंवा रक्तदेखील आले नाही. माझे वय २० वर्षे आहे. माझ्या पतीला माझ्या चारित्र्याविषयी शंका वाटते. कृपया मार्गदर्शन करा.
उत्तर- पुरुषाचा येथे मोठा गैरसमज झालेला असतो. प्रथम रात्री संभोग करताना स्त्रीयोनीमार्गातून रक्त यावेच लागते, योनीमार्गात असलेला पडदा फाटावाच लागतो तरच ती मुलगी पवित्र आहे, हे अशास्त्रीय विचार पुरुषांच्या मनामध्ये त्याचे मित्र, अशास्त्रीय कामुक पुस्तके व्यवस्थित पसरवीत असतात. याचा परिणाम म्हणून तो स्त्री चारित्र्यावर संशय घेतो व कारण नसताना संसार उध्वस्त करून घेतो.
योनीमार्गात प्रवेशद्वारालाच एक पातळ पडदा (Hymen) असतो. ज्याला छिद्र असल्याने मासिक पाळीवेळी त्या छिद्रातून रक्त येत असते. नैसर्गिकत:च पडदा घट्ट असणे, पडदा बिलकुल नसणेच किंवा त्याला छिद्र नसणे असे प्रकार घडतात. त्याचबरोबर पोहणे, सायकल चालविणे, हस्तमैथुन या कारणाने पडदा फाटलेला असतो. त्यामुळे प्रथम संभोगावेळी रक्त येत नाही. तुमच्यात वरीलपैकी कोणतेही कारण घडू शकते. त्यामुळे तुमच्या पतीने तुमच्यावर संशय घेणे योग्य नाही. पतीला विश्वासात घ्यावे व स्त्रीरोग तज्ज्ञ अथवा सेक्सॉलॉजिस्टना भेटावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)