आजचा प्रश्न
प्रश्न- दोन संभोगामध्ये किती दिवसाचे अंतर असावे ?
उत्तर- प्रत्येक स्त्री-पुरुषांची लैंगिक भूक वेगवेगळी असते. तसेच एकाच स्त्रीत-पुरुषात स्थळ, काळानुसार, हवामानानुसार वेगवेगळी वासना असते. शक्यतो नवविवाहित जोडपी संकोच न बाळगता, खाजगी शयनगृह मिळत असेल तर दिवसातून दोन-तीनवेळा संभोग अनुभवतात. एखादा मित्र त्याचे कामजीवन सांगतो तेव्हा त्यांच्याशी आपल्या कामजीवनाची तुलना करू नये. बऱ्याचदा पुरुष अशी तुलना करतो व घाबरून स्वतःला दोषी ठरवतो. संभोगातील विविधता लक्षात घेण्यासाठी तज्ज्ञांना भेटावे.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)