आजचा प्रश्न
प्रश्न- लिंगाची लांबी मोठी असेल तर त्यांनी कोणता कंडोम वापरावा ? देशपरत्वे लिंगाची लांबी कशी आहे ?
उत्तर- आशिया व आफ्रिकन या देशांमध्ये संशोधन केल्यावर असे लक्षात आले की, आशियाई कंडोम्सचा सरासरी घेर ३.९ ते ४.९ सेंमी. आहे. तर आफ्रिकन कंडोम्सचा घेर सरासरी ५.२ ते ५.५ सेंमी. आहे. मोठ्या लिंगासाठी 'लार्ज' कंडोम उपलब्ध असतो. रेग्युलर कंडोम हा मोठ्या लिंगाच्या पुरुषाने वापरला तर संभोगासमयी कंडोम योग्य बसला नसल्याने निसटतो, फाटतो. आफ्रिकन पुरुषामध्ये सरासरी १७.२, अमेरिकन १६.२, मध्यपूर्व देश १६, युरोपीयन १५.९, आशिया १४ सेंमी (यामध्ये भारताचा समावेश) अशी लांबी आहे.
अनुवंशिकतेनुसार ठरलेला हा लिंगाचा आकार कोणत्याही यंत्राने वाढवता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)