आजचा प्रश्न
प्रश्न- मी २६ वर्षीय विवाहित आहे. माझी पत्नी २२ वर्षीय असून ती कामूक चित्रपटातली सर्व आसने करावयास सांगते. स्त्री असे कसे म्हणू शकते ?
उत्तर- लग्नापूर्वी तिने कुठेतरी पाहिले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिच्या अपेक्षा वाढल्या, परंतु तुम्हा दोघांना 'कामूक चित्रपटातील' सत्य व असत्य काय, हे सांगावे लागेल. त्यानंतर दोघांना जे आवडेल ते तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळा पुरुष अशी स्त्रीकडून अपेक्षा करतो. इथे तुमची पत्नीच तुमच्याकडून अपेक्षा करत आहे, त्यामुळे ते तुम्हाला नवीन वाटते. चार भिंतीच्या आत खाजगी आयुष्यात दोघांच्या शरीर व मनाला काही त्रास होत नसेल तर दोघांच्या इच्छेने संभोगात काहीही करणे हे त्यांच्यासाठी योग्य असते. तुमच्या पत्नीशी चर्चा करा व ठरवा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)