आजचा प्रश्न
प्रश्न- भारतात विवाहपूर्व संबंध किती वयात घेतले जातात ? कारण काय ?
उत्तर- सर्वेक्षण केल्यानंतर असे दिसून आले, की मुंबईचे तरुण १७.६ वर्षे वयात, बेंगलोर १७.९ वर्षे वयात, दिल्ली १८ वर्षे, कोलकत्ता १८.१ वर्षे, चेन्नई १९.११ वर्षे वयात प्रथम संभोग अनुभवतात. यामागील कारणात पालकांचे मुलांना अतिस्वातंत्र्य देणे, खर्चासाठी खूप पैसे देणे, दोघेही नोकरदार असल्याने मुलांच्या वर्तनाकडे लक्ष नाही, हॉटेल-लॉज सोयीस्कर मिळणे व लैंगिक शिक्षणाचा अभाव यांचा समावेश आहे, हे लक्षात आले. देशातील नऊ राज्यांनी लैंगिक शिक्षणाला विरोध केला, नकार दिला. यापेक्षा वाईट परिस्थिती येणाऱ्या दहा वर्षांत पाहायला मिळणार आहे. आपली मुलं, मुली अशी नाहीत अशा भ्रमात पालक असतात, त्यांना जागे करावे लागेल.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)