आजचा प्रश्न
प्रश्न- संभोग झाल्यानंतर पती-पत्नींनी वस्त्रे परिधान करावीत का ?
उत्तर- संकोच, भीतीखातर पती-पत्नी संभोग झाल्यानंतर लगेच वस्त्रे परिधान करतात. तसे करणे चुकीचे आहे. संभोगपश्चात क्रियांमध्ये स्त्रीला कामपूर्ती मिळाल्यावर शरीराला कुरवाळणे बऱ्याच वेळा आवडत असते. प्रत्यक्षात असे घडते की, खाजगीपणा नसल्याने अंधारात संभोग करावा लागतो. पूर्ण नग्नता नसते व स्त्रीच्या कामपूर्तीचा विचार बरेच पुरुष करतच नाहीत. त्यामुळे संभोगपश्चात शरीर कुरवाळणे, एकमेकांच्या बाहुपाशात राहणे फार दूरचा भाग आहे. जे कामजीवनाविषयी शिक्षित आहेत ते हे पाळतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)