आजचा प्रश्न
प्रश्न- लग्नासाठी स्त्री-पुरुषांचे रक्तगट जुळले पाहिजेत का ?
उत्तर- अशी काही आवश्यकता नसते. रक्तगटापेक्षा रक्तातील आर.एच. घटक महत्वाचा असतो. स्त्री मध्ये आर. एच. नेगेटिव असेल व पुरुषामध्ये पण नेगेटिव असेल तर काही प्रॉब्लेम नाही. दोघांचा पोजिटीव्ह असेल किंवा दोघांचा निगेटिव असेल तरी चालतं. फक्त स्त्री मध्ये नेगेटिव आणि पुरुषामध्ये पोजिटीव्ह असेल तर त्या स्त्रीला पुढील काळात होणाऱ्या दुसऱ्या संततीवर त्याचा परिणाम होतो.
अशावेळी घाबरण्याचे काही कारण नाही. फक्त AntiD IMMUNO GLOBULIN चे इंजेक्शन स्त्रीच्या पहिली डिलिवरी नंतर तिला २४-७२ तासात घ्यावे लागते. मग दुसऱ्या संततीचा जन्म नॉर्मल होतो.
रक्तगट जुळत नाही म्हणून लग्न मोडण्याचे कारण नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)