आजचा प्रश्न

प्रश्न- सम विषम तारखेनुसार सेक्स केल्यावर मुलगा किंवा मुलगी पक्के जन्मते हे खरे आहे का?
उत्तर- स्त्रीमधे XX chromosomes असतात आणि पुरुष शुक्राणु मधे XY. जर स्त्री च्या X बरोबर पुरूषाचा X chromosome असलेला शुक्राणु संयोग झाला तर मुलगी होते आणि जर स्त्री च्या X chromosome ला पुरूषाचा Y chromosome असलेला शुक्राणु संयोग झाला तर मुलगा होतो. हे कुणाच्या हातात नसते. X आणि Y chromosome वाहक शुक्राणुचा आकार वेगवेगळा असतो. वीर्यपतन योनीमार्गात झाल्यावर कोण किती जोरात पळते व त्याचा स्त्री बीजाशी संयोग होतो याचा संभोगाच्या तारीख तिथीशी संबंध नाही.
मुलगा पाहिजे मुलगाच होईल अशा जाहिराती फसवणूक आहेत. मुलगी नको म्हणणारे जास्त आहेत. यावरून या देशात दगडातील स्त्रीचा आदर केला जातो पण जीवंत स्त्री नको असा अर्थ होतो.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)