आजचा प्रश्न
प्रश्न- सुंता केलेल्या आणि न केलेल्या पुरुषाला सेक्समधे काय फायदे तोटे होतात ?
उत्तर- पुरुष लिंगावर शिश्नमुंड आवरित करणारी मागे पुढे सरकणारी एक त्वचा असते. ती लहानपणी ७-८ वर्षे वयानंतर मागे-पुढेे होते. काहींमधे ती मागे येत नाही, मागे येताना त्रास होतो. मूत्रविसर्जन तुंबून होते. अशावेळी काही मलम लावून बरे करता येते. पण तसे झाले नाही तर सुंता करावा लागतो.
मुस्लिम, ज्यू लोकांमध्ये धर्मानुसार सुंता केला जातो. सुंता केल्याने सेक्समधे फायदा अगर तोटा काही होत नाही. फक्त शिश्न मुंडावरील त्वचा मागे येतच नसेल तर हे करणे उचित.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)