आजचा प्रश्न
प्रश्न- कांदा, लसूण खाल्ल्याने वीर्य व लिंगाची लांबी वाढते का ?
उत्तर- नाही. या पदार्थांनी वीर्य वाढते याला शास्त्रीय आधार बिलकुल नाही. संप्रेरकांची रक्तातील पातळी, अनुवंशिकता यावर लिंगाची लांबी अवलंबून असते. ती कोणत्याही पदार्थाच्या सेवनाने वाढविता येत नाही. वीर्य वाढविण्यासाठी रोज पुरेसा व्यायाम, योग्य आहार विशेषतः हिरव्या पालेभाज्या ज्यामध्ये ई जीवनसत्वाचा समावेश असतो. यामुळे वीर्याची वाढ होते.
पुरुष लिंगाच्या लांबीला फार महत्त्व देतो तसे नाक, हात, पाय या अवयवांच्या लांबीला महत्त्व देत नाही. त्यामुळे लिंग व वीर्याची वृद्धी यावर भर दिल्या जाणाऱ्या फसव्या जाहिराती व जुनाट विचार यांचा फार प्रभाव पडलेला आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)