आजचा प्रश्न
प्रश्न- मी सतरा वर्षीय तरुण आहे. काही कामूक चित्रांचे पुस्तक पाहिल्यावर व वाचल्यावर मला उत्तेजित वाटते, यात काही गैर आहे का ?
उत्तर- वयात आल्यानंतर विरुद्धलिंगी आकर्षण निर्माण होणे व कामूक चित्रांकडे पाहून कामवासना वाढणे, हस्तमैथुन करणे हे अतिशय नैसर्गिक आहे. यात काहीच गैर नाही. उलट असे कामूक होणे नको वाटणे किंवा असे पाहून देखील कामूक न होणे, हे आजार आहेत. त्याचबरोबर हे लक्षात घ्यावे की यासाठी तुम्ही किती वेळ व पैसा खर्च करत आहात. सतत दैनंदिन जीवनात असे होत असेल तर काही मानसिक व व्यक्तिमत्वात दोष निर्माण होऊ शकतो. कामवासने बरोबरच तुमच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी आवश्यक सर्व क्रिया तुमच्याकडून घडायला हव्यात हेही लक्षात घ्या. त्यामुळे चित्र पाहण्यावर किती भर द्यायचा हे तुम्हीच ठरवा. अशी चित्रे किती बघवीत यासाठी कोणता नियम नाही, निश्चित संख्या नाही. तुम्हाला त्याचे व्यसन वाटत असेल तर तज्ज्ञांना भेटून एकदा खात्री करून घ्यावी. शिवाय अशा पुस्तकांतून कामजीवनाविषयी काही अतिरंजित व चुकीची माहिती देखील प्रकाशित होण्याची शक्यता असते. यातून तुमची दिशाभूल होईल असे वाटते. 

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)