आजचा प्रश्न
प्रश्न- अति हस्तमैथुनाचे दुष्परिणाम कोणते ?
उत्तर- कामशास्त्रामध्ये अतिहस्तमैथुनाची अशी पक्की व्याख्या नाही. दररोज एक-दोन वेळा हस्तमैथुन करणे कोणाला 'अति' वाटेल, आठवड्यातून दोन वेळा करणे ही 'अति' वाटेल, दोघांमधील लैंगिक भूक त्यांच्यापुरती नॉर्मलच म्हणावी. यात कोणीच रोगी नसतो. स्त्री पुरुषांमध्ये वाढलेली कामवासना मोकळी करण्याचा 'हस्तमैथुन' हा एक सुरक्षित मार्ग आहे. तसेच Compulsive Masturbation म्हणजे जो पुरुष अथवा स्त्री दैनंदिन जीवनात सतत हस्तमैथुन करत असतो तो. म्हणजे जेवण, खाणे-पिणे, अभ्यास, व्यायाम, समाजात मिसळणे याकडे लक्ष न देता निव्वळ हस्तमैथुन करत राहणे याला मानसिक रोग म्हणता येईल. त्यामुळे 'अति' याचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्यावा लागेल. दैनंदिन जीवनातील वर उल्लेखलेली सर्व कामे करून वाढलेली कामवासना शमविण्यासाठी हस्तमैथुन करणे (मग ते कितीही वेळा असू देत) ते नैसर्गिकच आहे. वीर्याचा साठा कधीही संपत नाही.
वर्तमानपत्रातील हस्तमैथुनविषयी पुस्तकांच्या व औषधांच्या जाहिराती पूर्णपणे बोगस असतात. याचे मूळ कारण स्वतःचे खिसे भरणे, भोळ्या जनतेला फसविणे एवढेच असते हे पक्के लक्षात ठेवा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)