आजचा प्रश्न
प्रश्न- वेश्या व्यवसाय व समलैंगिकता यावर बंदी झाली तर एड्सची संख्या कमी होईल का ?
उत्तर- मुळातच समलैंगिकतेनेच एच.आय.व्ही. बाधा होते हा गैरसमज आहे. दूषित लैंगिक संबंध कोणत्याही एच.आय.व्ही. बाधित स्त्री-पुरुषाबरोबर झाला तर एच.आय.व्ही. पसरतो. वेश्या व्यवसाय पूर्वीपासून चालत आलेला आहे. जगात सर्वत्र आहे. तो थांबवणे निव्वळ अशक्य आहे. 
एच.आय.व्ही./एड्सची भारतीय/जागतिक संख्या कमी करावयाची असेल तर शास्त्रीय लैंगिक शिक्षण देणे व खोट्या जाहिराती व फिरत्या डॉक्टरांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)