आजचा प्रश्न
प्रश्न- कामपूर्ती अभावी काही आजार होतात का ?
उत्तर- स्त्रीमध्ये कामपूर्ती मिळाली नाही की शारीरिक आजार किंवा गंभीर समस्या निर्माण होते असे नाही. तरी तिला कामपूर्ती नैसर्गिकरित्या मिळू शकते. पुरुषाला हस्तमैथुनाची माहिती मिळाल्याने त्याची तो कामपूर्ती करून घेतो. स्त्रीला ती माहिती मिळाली नाही तर तोपर्यंत ती गप्प राहते. काही स्त्रियांना माहिती प्राप्त झाली की कामपूर्ती मिळण्याची धडपड सुरू होते. त्यात मिळाली नाही तर ती त्याचा त्रास करून घेऊ शकते. सध्या स्त्री नेट वरून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करते. हस्तमैथुन करून बऱ्याच स्त्रियांना कामपूर्ती अनुभव मिळतो. मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला अपेक्षित आहे. काही स्त्रिया संकोच करून तसेच गप्प बसतात. तर काही खूप घाबरून आपल्यात काहीतरी दोष, कमतरता आहे असे समजून मानसिक त्रास करून घेतात. दोन्ही गोष्टी करण्याची गरज नाही. शेवटी कामजीवन माहिती महत्त्वाची आहेच.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)