आजचा प्रश्न

प्रश्न- गर्भधारणेसाठी कधी सेक्स करावा ?
उत्तर- वयात आल्यावर स्त्रियांना प्रति महिना पाळी येत असते. योनीतून ४-७ दिवस रक्तस्त्राव होत असतो.
पाळी सुरू झाल्यावर सरासरी १४ व्या दिवशी स्त्री बीज परिपक्व होते व फुटते आणि ते २४-७२ तास जिवंत राहते. या काळात त्याचा संपर्क पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणूशी झाला तर गर्भधारणा राहते. 
समजा, एखाद्या स्त्रीला जर १ एप्रिलला मासिक पाळी सुरू झाली तर तर त्यामध्ये ८ दिवस मिळवावेत म्हणजे ९ एप्रिल झाले. ९ ते २२ तारखेपर्यंत जर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता रोज किंवा एक दिवस आड सेक्स केला तर स्त्री गरोदर राहते. याच पद्धतीने इतर कोणत्याही तारखेला पाळी सुरू झाली तरी वरील प्रमाणे दिवस काढायचे.
स्त्री जर गरोदर झाली तर १ मे ला येणारी पुढील पाळी येत नाही. (पाळी काही दिवस पुढे मागे होऊ शकते.) शक्यतो २८-३० दिवसाला स्त्रीला नियमित पाळी येत असते.
विवाहानंतर लगेच पुढील महिन्यात स्त्री गरोदर झाली की पुरुष समजतो त्याच वीर्य स्ट्रॉंग आहे आणि सूनेचे पण कौतुक केले जाते. वास्तवात फक्त बीजांड त्या वेळी फुटलेले असते म्हणून सेक्स केल्यावर लगेच गरोदर राहते एवढेच.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)