आजचा प्रश्न
प्रश्न- मी सत्तावीस वर्षीय विवाहिता आहे. पतीबरोबर संभोग करताना मला फार जलद कामपूर्ती होते ही काही समस्या आहे का ?
उत्तर- १९५३ साली अभ्यासलेल्या सर्वेक्षणात १४ टक्के स्त्रियांना एकाच संभोग सुखात एकापेक्षा जास्तवेळा कामपूर्ती झालेल्या आढळल्या. पुरुषांच्या जलद कामपूर्तीवर म्हणजे शीघ्र वीर्यपतनावर कामशास्त्रज्ञांनी बरीच चर्चा केली आहे. परंतु स्त्रीची जलद कामपूर्ती फार कमी पहावयास मिळते. त्यामुळे फारसे यावर चर्चा होत नाही.
स्त्रीला कामपूर्ती मिळण्यासाठी हस्तमैथुन, प्रत्यक्ष संभोग, मुखमैथुन, कामक्रीडा या कोणत्याही क्रियेचा वापर करता येतो. काही स्त्रियांना हस्तमैथुनानेच कामपूर्ती मिळते तर काहींना फक्त मुखमैथुनानेच. तुम्हाला संभोगसुखात कामपूर्ती जलद मिळते हे चांगलेच आहे. एक वेळा कामपूर्ती मिळाल्यावर पतीच्या सहकार्याने किंवा स्वतः शिश्नीका चेतवून पुन्हा कामपूर्ती अनुभवू शकता. यात काहीच गैर नाही. याउलट काही स्त्रियांना त्यांच्या पतीकडून कितीही प्रयत्न केला तरी पाऊण तासांपर्यंत देखील कामपूर्ती मिळत नाही. एकदा कामपूर्ती मिळाल्यानंतर पुढील संभोगात स्त्रीला कदाचित 'आवड' राहत नाही. काहींना कामपूर्तीची तीव्रता जास्त अनुभवल्यानमुळे झोप देखील येते. स्त्रीची कामपूर्ती होण्यासाठी वेगवेगळी कारणे महत्वाची आहेत. ती सर्वच कारणे तुमच्या बाबतीत घडतायेत त्यामुळे तुम्हाला कामपूर्ती जलद मिळत आहेत. यात गैर ते काय ? तरीदेखील तुम्हाला कामपूर्ती इतकी जलद नको असेल तर काही अॅलोपॅथी औषधांचा वापर करून थोडावेळ वाढवता येऊ शकतो. खरेतर हे विशिष्ट गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे घडत असते. अधिक माहितीसाठी तज्ञास भेटावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)