आजचा प्रश्न

प्रश्न- कॅन्सरग्रस्त व्यक्ती सेक्स करु शकतो का?
उत्तर- कॅन्सर विविध प्रकारचा, विविध अवयवांचा होतो. यामध्ये वजन, रोगप्रतिकारक शक्ती कमी येत असते. अशामधे औषधे, दवाखाना, खर्च यामुळे सेक्सकडे दुर्लक्ष होते. तरी मेंदूतील सेक्स भावना, लैंगिक संप्रेरक जोपर्यंत कार्यरत आहेत तोपर्यंत सेक्स भावना होणे यात गैर काही नाही. पुरूष रुग्ण असेल आणि ताठरता येत असेल तर दोघांच्या इच्छेने सेक्स करायला हरकत नसावी. आजार जास्त पसरला असेल तर हे प्रमाण खूप कमी येईल किंवा पूर्ण थांबेल.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)