आजचा प्रश्न
प्रश्न- माझं वय ४५ वर्षे आहे. मला शीघ्रपतनाचा त्रास आहे. एकदा संबंध केला की, दुसऱ्यावेळी लिंग ताठरता लवकर येत नाही. मला कोणतेही व्यसन नाही. यावर उपाय काय ?
उत्तर- शीघ्रवीर्यपतन होण्यामागे व्यसन हे कारण नाही. एकदा सेक्स झाल्यावर लगेच दुसऱ्यावेळा ताठरता प्रत्येकवेळा, प्रत्येकाला यावीच, असा काही नियम नाही. आणि ती समस्याही नाही. वयामुळे, लैंगिक भूक किती आहे, साथीदार किती क्रियाशील आहे, यावर दुसरी ताठरता कधी येईल हे ठरते. वीर्यपतन लवकर होऊ नये म्हणून अॅलोपथीमध्ये परिणामकारक औषधी असतात. तज्ज्ञांना भेटून उपचार, सल्ला घ्या.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)