आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स स्टॅमिना म्हणजे काय ?
उत्तर- हा तर कौन बनेगा करोडपती मधला अवघड प्रश्न आहे. कारण याची वैद्यकीय व्याख्या अशी नाही. आपापली स्वतःची अशी व्याख्या लोकं करतात. ताठरता जास्त वेळा येणे, जास्त वेळ टिकणे, सेक्स सतत करावेसे वाटणे, वीर्यपतन लवकर न होणे, वीर्य खूप पडणे याला सेक्स स्टॅमिना, सेक्स पॉवर असे शब्द वापरले जातात. गंमत म्हणजे डॉक्टर्स या शब्दाचा अर्थ त्यांना माहित असलेल्या ऐकीव व्याख्येवरूनच काढतात आणि सगळ्या समस्यांवर सिल्डेनाफिल देतात. कारण सिल्डेनाफिल हे एकच औषध ताठरतेवर चांगले काम करते कि जे शीघ्रवीर्यपतन, लैंगिक इच्छा यावर काम करत नाही. अशा प्रकारे उपचार नीट होत नाही. खरेतर सेक्सचा शास्त्रीय अभ्यास, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवणे हे उत्तम मार्ग आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)