आजचा प्रश्न
प्रश्न- नियमित सेक्स न करण्याचे स्त्री-पुरुषांना काय दुष्परिणाम होतात?
उत्तर- सेक्सची इच्छा कमी असेल तर त्यावर उपचार केला पहिजे. पण व्यवसाय, नोकरी यामुळे ठरवून सेक्स कमी केला तर वासना, ताठरता कमी होते, सेक्स झालाच तर वीर्यपतन लवकर होते. आळशीपणा वाढू लागतो. स्त्रीमधे स्तन, शिश्नीका (clitoris) यांमध्ये संवेदना कमी होतात. तसेच योनीमार्ग कोरडा पडतो, ज्यामुळे वेदनायुक्त संभोगाची शक्यता वाढते.
नियमित सेक्स म्हणजे रोज नव्हे. पण जे प्रमाण आहे ते बऱ्याचदा आठवड्याला ३ वेळा पहायला मिळते. नोकरी, जागेचा व वेळेचा अभाव यामुळे हे प्रमाण कमी येत आहे. त्वचा, सम्प्रेरक, हृदय, फुफ्फुस, तारुण्य यावर नियमित सेक्सचा फायदा होत असतो.
योग्य मार्गदर्शन घेऊन सेक्स लाईफमधे बदल करता येतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)