आजचा प्रश्न

प्रश्न- लैंगिक समस्यांवर ऑनलाईन उपचार शक्य आहे का ? 
उत्तर- डॉक्टरकडे पेशंट जातो कारण समोरासमोर डॉक्टरसोबत चर्चा करून, तपासणी करून मूळ कारण समजते आणि उपचार करता येते. जिथे गैरसमज हीच कारणे असतात तिथे ऑनलाईन माहिती देऊन गैरसमज दूर करता येतो. पण लिंग आकार, लिंग वाकडेपणा, स्तन आकार, कामवासना अधिक/कमी असणे, लैंगिक छळ अशा समस्यांवर ऑनलाईन उपचार शक्य नसतो, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. बऱ्याच लोकांना सगळे ऑनलाईन शक्य आहे असा गैरसमज असतो आणि मग त्यांच्या अपेक्षा वाढतात. यातच ते योग्य उपचारापासून दूर राहतात. या वागण्यामुळे भोंदू डॉक्टर पेशंटला न तपासता, न केस टेकिंग घेता पोस्टाने उपचार पाठवून लोकांना लुबाडत असतो.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)