आजचा प्रश्न

प्रश्न - चांगली पोर्नोग्राफी असू शकते का?
उत्तर- हो नक्कीच! प्रत्येक कामुक चित्रपटात काहीतरी शिकण्यासारखे असते. नेमके पोर्नो वाईट असते असे सतत सांगितल्यामुळे तीच बाजू जास्त पटू लागते. लेख आणि व्याख्यान, चर्चा यात पोर्नो वर चर्चा होण्यापेक्षा porn addiction वर चर्चा होते. त्यातील चांगली बाजू सांगितली जात नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तर यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स कमी आहेत.
स्त्रियांनी स्त्रियांसाठी तयार केलेली पोर्नो फिल्म असते. त्यात आलिंगन, चुंबन आदि क्रिया, कामपूर्ती, एकमेकांना विविध ठिकाणी उद्दीपित करणे, हे खरे वाटण्यासारखे चांगले दाखवले जाते. त्यामुळे नेहमीपेक्षा अशी स्त्रियांसाठीची पोर्नो बघणे कधीही चांगले ठरते.
बरेचसे लोक, डॉक्टर्स याबद्दल अनभिज्ञ आहेत. Porn Addiction पेक्षा गंभीर असे मोबाईल, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग, दारू, सिगारेट, व्हिडीओ गेम्स, जुगार अशी व्यसने आहेत. यावर जास्त चर्चा आणि उपायांची गरज आहे.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)



विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.