आजचा प्रश्न
प्रश्न- पन्नाशीनंतर कामेच्छा कमी का होते?
उत्तर- स्त्रीमध्ये मासिक पाळी साधारण ४०-५० वयात कायमची येणे बंद होते. सेक्स सम्प्रेरक पातळी कमी झाल्याने लैंगिक इच्छा, योनीतला ओलावा कमी येतो. पुरुषांमधे टेस्टोस्टेरॉन हे सम्प्रेरक कमी होऊ लागते, त्यामुळे लिंग ताठरता कमी येते. हे पन्नाशीनंतर फार जाणवते. पण हा परिणाम व्यायाम, आहार, मन आणि शरीर तंदुरूस्त ठेऊन पुढे ढकलता येऊ शकतो. नेमके याची सुरुवात तरुणपणी व्हावी लागते. लोक काहीतरी प्रोब्लेम आला की व्यायाम, आहार यावर लक्ष द्यायला सुरू करतात. त्यामुळे यात काहींना यश मिळत नाही. कामेच्छा कमी झाली की तज्ञास भेटून उपचार घ्यावा लागतो. बऱ्याचदा उपचाराला फक्त पुरुष येतो. स्त्री बोलत नाही किंवा वेगळ्याच डॉक्टरना सल्ला विचारतात. कॅप्सूल, मलम यात वेळ घालवतात. तसेच स्त्रीमध्ये हॉर्मोन रेप्लसमेन्ट थेरपी असते ती योग्य डॉक्टरकडून करता येते.




डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)


विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.