आजचा प्रश्न
प्रश्न- पालकांनी मुलांना लैंगिक शिक्षण देताना काय काळजी घ्यावी?
उत्तर- प्रथम पालकांनी स्वतः याबद्दल अभ्यासू असले पाहिजे. तज्ञ डॉक्टरकडून लैंगिक अवयव विषयक शास्त्रीय माहिती करून घेतली की सोपे जाते. तरी आजकाल स्मार्ट फोनवरून मिळणारी सेक्स विषयक माहिती ही एका क्लिकवर मिळू लागली आहे.
पालकांनी मुलांशी संवाद साधताना शास्त्रीय भाषा वापरावी, कोणत्याही प्रश्नाला हसू नये कारण तुम्हाला साधे वाटणारे प्रश्न मुलांसाठी फार महत्वाचे असू शकतात. सर्वच स्त्री-पुरुषांनी अव्वा इशा म्हणायचे पहिले बंद करावे. हा शब्द भावी आयुष्यात फार मोठे नुकसान करतो, लैंगिक अवयवांकडे पाहण्याचा दृष्टिकोण वाईट होतो.
"आमच्या वेळी गरज वाटली नाही, मुलांनाही याची गरज नसते", ह्या भ्रमातून बाहेर आला तर फायदा जास्त होईल.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.