आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स एज्युकेशन देऊन देखील हस्तमैथुनविषयी मुलांमध्ये गैरसमज आहेत. म्हणजे अशा एज्युकेशनने फायदा होत नाही असे आहे का?
उत्तर- हस्तमैथुनविषयी एकदा सांगितले तर सर्वांचे गैरसमज दूर होतील असे नाही. शाळा, कॉलेजमधे ज्यावेळी दिले जाते त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना देखील दिले पाहिजे. थोडक्यात सतत शिक्षण दिले पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांच्या डोक्यात चुकीची माहिती भरली जाते. त्याला पेपरमधील खोट्या जाहिराती कारण असतात. त्यावर बंदी आणली पाहिजे. त्यातच आता youtube वर कुणाचे बंधन नाही, त्यामुळे खोट्या माहिती झपाट्याने पसरत आहेत. समाज घरात बसून सगळी माहिती मिळवण्याच्या नादात आपण काय शिकत आहोत, याचे भान हरवून बसलाय. खोटे लोक याचा पूरेपूर फायदा घेत आहेत. सतत शास्त्रीय लैंगिक शिक्षण देणे हा पर्याय आहे. हे शिक्षण देणारे पण हस्तमैथुनविषयी गैरसमज असलेले मी शिक्षक पाहिले आहेत. मोठा लढा आहे हा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.