आजचा प्रश्न

प्रश्न- पहिल्यांदा सेक्स केल्यावर शिश्न दुखते का? मला जखम झाली आहे.
उत्तर- माहिती नसताना सेक्स केला तर स्त्री-पुरुष दोघांना किंवा कुणा एकाला त्रास, जखमा होऊ शकतात. स्त्रीमधे योनीद्वारपटल म्हणजे हायमेन फाटते, पण पुरुषांच्या शिश्नमुंडाला लागून असलेली शीर तुटत नाही. ती तुटली याचा अर्थ जबरदस्तीने, चुकीच्या पध्दतीने सेक्स केला गेला आहे हे लक्षात येते. पहिल्या वेळी सगळे चुकतातच असे म्हणण्यापेक्षा सेक्सचा अभ्यास करून पहिला सेक्स देखील चांगला होतो. नजीकच्या डॉक्टरकडून लिंग तपासणी करून जखमेवर उपचार घ्या.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.