आजचा प्रश्न


प्रश्न- दररोज सेक्स करणे चांगले की वाईट ?
उत्तर- दोघांचीही इच्छा असेल तर उत्तम. सेक्सने त्वचा, हृदय, संप्रेरके, मेंदू, मन, शुक्राणू यांना फायदा असतो. पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे. अर्थातच २१ वेळा वीर्यपतन हस्तमैथुन किंवा सेक्स यातून होऊ शकते. फक्त सेक्समधूनच व्हावे असे नाही. इथे महत्वाचे आहे ते पार्टनरची इच्छा असणे. कारण अशा माहितीमधून पुरुष अर्धी माहिती मान्य करतो. पार्टनरचा विचार करत नाही. हल्लीची मुलं-मुली सेक्स लवकर अनुभवतात. पण सेक्स माहिती अर्धवट आहे. फक्त कोण्डोम वापरायचा असतो एवढेच माहिती आहे. त्यामुळे विवाहापूर्वी बॉयफ्रेंड बरोबर सेक्स करताना चुकीची अपेक्षा करून वाद जास्त होऊ लागलेत. तसेच विवाहित तरुणी त्यांच्या पार्टनरकडून अतिअपेक्षा करून त्या पूर्ण झाल्या नाहीत, की घटस्फोटचा निर्णय जलद घेतात. यात लैंगिक जीवनाबद्दल अर्ध्या माहितीवर हा सगळा घोळ होत आहे. म्हणजे विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा पण त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)