आजचा प्रश्न

प्रश्न- वीर्यपतन झाल्यावर लिंग लगेच शिथिल का होते ?
उत्तर- लिंग हे तीन नळ्यांनी बनलेले असते. त्यात अनेक बारीक बारीक पोकळ्या असतात. वासना वाढल्यावर त्यात रक्त भरते म्हणून लिंग कडक होते. वीर्यपतन झाल्यावर लिंगातील रक्तसंचय हा पुन्हा शरीराकडे पाठवला जातो. परिणामी साहजिकच लिंग शिथिल होते.
प्रायापीझम या समस्येत वीर्यपतन झाले तरी लिंग ताठरता तशीच राहते. ती कधी ३-६ तास तशीच राहते. अशा वेळी मूत्ररोगतज्ञ उपचार करून ती ताठरता कमी करतात. तरुणपणी वासना किती आहे आणि पार्टनर किती सक्रिय आहे त्यावर पुन्हा लिंग ताठरता कधी येणार हे ठरते.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)