आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स लाईफ बोरिंग होणे सामान्य आहे का ?
उत्तर- सेक्समधला तोच तोचपणा, आसनामध्ये काही नाविन्य नाही, नोकरी व्यवसायामधील स्पर्धा, मानसिक ताण यामुळे सेक्समधला इंटरेस्ट काही काळ कमी होऊ शकतो किंवा नको वाटतो, हे ठीक आहे. पण त्यातून मार्ग काढावा. स्त्री-पुरुष त्याचा प्रयत्न न केल्याने सेक्समध्ये सुधारणा करत नाहीत. किंवा ठरवून शनिवारी-रविवारी सेक्स करतात. तोही यशस्वी नाही झाला तर वाद होतो किंवा दोघेही नाराज होतात. व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक झाले पाहिजेत म्हणजे सेक्स बोरिंग होणार नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)