आजचा प्रश्न
प्रश्न- शुक्राणू कमी असतील तर लिंग ताठरता कमी येते का?
उत्तर- लिंग ताठरता येण्यासाठी रक्तातील टेस्टोस्टेरॉन सम्प्रेरकाचा सहभाग असतो. शुक्राणू कमतरता असण्यामागे सम्प्रेरक हे कारण असेल तर त्या पुरुषात दोन्ही समस्या दिसतील. पण प्रत्येकामध्ये शुक्राणू कमी आहेत म्हणून ताठरता नाही आणि ताठरता कमी म्हणजे शूक्राणू कमी असे नसते. विविध कारणे असतात. नेमके कारण शोधून उपचार करता येतो. "शुक्राणू वाढवून सेक्सची ताकद वाढवा" अशी जाहिरात फसवेगिरी असते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)