आजचा प्रश्न
प्रश्न- उत्तेजित करणारी वस्त्रे परिधान केलेली स्त्री कामुक, सेक्सची आवड असणारी असते का?
उत्तर- स्त्री-पुरुष समाजात वावरताना वस्त्रे कशी घालतात यावरून ते दोघे सेक्समध्ये खूप तरबेज आहेत, कामुक आहेत असा अंदाज करता येत नाही. अगदी मॉडर्न कपडे परिधान केलेली स्त्री देखील सेक्समध्ये अकार्यक्षम असू शकते किंवा बिलकूल इच्छा नसलेली देखील असू शकते. याउलट साधी राहणी असलेली स्त्री कामजीवनात अत्यंत सक्रिय असू शकते. थोडक्यात कपड्यांवरून तिची सेक्सची आवड निवड, इच्छा याचा अंदाज करता येत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)