आजचा प्रश्न

प्रश्न- पुरुषाला पहिल्या सेक्सला वीर्यपतन लवकर होते व  नंतरच्या सेक्समधे वेळ लागतो आणि काहीवेळा पहिल्यांदा ताठरता चांगली नसते, नंतरच्या सेक्सला येते. असे का ?
उत्तर- दोन्ही केसमधे जे घडते ते नॉर्मलच आहे. पहिल्या सेक्सला लिंग कडक चांगले असते आणि नंतर चांगले होत नाही असेही होते. वय, किती कामुक झालाय, पार्टनर कामुक करण्यास किती मदत करतो, यावर लागोपाठ सेक्स करणे वा न करणे अवलंबून असते. दुसऱ्या वेळा सेक्स करताना देखील वीर्यपतन लवकर होणारे आहेत. शीघ्र वीर्यपतन असेल तर उपचार करावा लागतो. इकडे दोन-तीन वेळा सेक्स झालाच पाहीजे हा बऱ्याच पुरुषांचा हट्ट असतो. त्यामुळे तसेच घडले नाही, तर तो घाबरतो, अपेक्षा वाढतात आणि मानसिक त्रास करुन घेतो.
कामजीवनातले तंत्र शिकून घेणे, दोघांचा व्यायाम असणे हे खरे फायद्याचे असते. हे घडत नाही आणि सेक्समधल्या अपेक्षा मात्र जास्त असतात. याचा अभ्यास करणे, हा खरा उपाय आहे.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)