आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्सला एवढे महत्व देणे योग्य आहे का?
उत्तर- अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी आहेत, तसे सेक्स हा पण महत्त्वाचा घटक आहेच. लग्नानंतर फक्त पहिल्या वर्षी सेक्स जास्त होतो, मुलं झाल्यावर हळू हळू कमी येतो, चाळिशीनंतर सेक्स कमी येतोच, अशा विचारांना पक्के धरून बसल्याने सेक्सचा आनंद कसा फुलवत ठेवायचा हा प्रयत्नच केला जात नाही आणि परंपरागत विचारांमुळे सेक्सला दुय्यम महत्त्व दिले जाते. शास्त्रानुसार सेक्सचे मानसिक आणि शारीरिक फायदे खूप आहेत, पण चुकीच्या विचारांमुळे त्यापासून स्वतःला वंचित ठेवले जाते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)