आजचा प्रश्न
प्रश्न- विवाहापूर्वी सेक्सचा अनुभव घेणे आवश्यकच असते का?
उत्तर- वयात आल्यानंतर वाढलेल्या सेक्स सम्प्रेरकामुळे वासना वाढते. मुलांमधे लिंग ताठरता आणि वीर्यपतन प्रमाण वाढते. मुलींमध्ये कामुक कथा वाचून, कामुक चित्र, चित्रपट पाहून वासना वाढते. अशावेळी हस्तमैथुन हा निर्धोक आणि सोईस्कर मार्ग वापरला जातो. काहींना शाळा, महाविद्यालयीन जीवनात सेक्स करायला मिळतो. नेमके इथे सुरक्षित सेक्स केला नाही तर गुप्तरोग, HIV infection, गर्भधारणा याची शक्यता वाढते.
आज विवाहपूर्व सुरक्षित सेक्सचे प्रमाण वाढलेले आहे. जबाबदारी स्वीकारून, फायदे तोटे माहित असताना दोघांच्या संमतीने सेक्स करत असतील तर तो त्यांचा खाजगी भाग आहे. पण विवाहपूर्व सेक्स केलाच पाहिजे असे काही नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)