आजचा प्रश्न
प्रश्न- पुरुष लिंग लहान असते का? आणि वाकडे असते का? यांचे उत्तर 'हो' आणि 'असे काही नसते' असे दोन्ही वेगवेगळ्या डॉक्टर्सकडून ऐकायला मिळते. नक्की काय खरे?
उत्तर- प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले नाही तर असे गैरसमज डॉक्टर आणि पेशंटच्या मनात निर्माण होत असतात. लिंग आकार लहान असतो का? याचे उत्तर ताठरता आल्यानंतर ५ सेंमी पेक्षा कमी असेल तर तो लहान म्हणतात. जो की जन्मजात आजार आहे. त्यापेक्षा जास्त लांब पण १० सेंमी पर्यंत एखाद्याला लहान वाटू शकते पण ते नॉर्मल असते. काहीही असले तरी लिंग आकार लहान आणि मोठे करायला कोणता उपचार नाही. याविषयीच्या सर्व जाहिराती खोट्या असतात.
लिंग वाकडे असते का? हो, पेरोनीस डिसीज मध्ये लिंग वाकडे असते. पण बऱ्याच पुरुषांमधे लिंग तिरके असते पण त्याला तो वाकडे म्हणतो. शब्द वापरण्यात चुकल्याने सगळा गोंधळ उडतो. थोडक्यात डॉक्टर कशी माहिती विचारतो, किती अभ्यासू आहे, यावर निदान बरोबर ठरते. सरकारच्या लैंगिक शिक्षणाच्या एका पुस्तकात "लिंग लहान आणि वाकडे नसते" असे वाक्य वाचनात आले. खरे तर ही अर्धवट माहिती धोकादायक आहे.
लिंग आकार आणि वाकडेपणा हे दोन्ही केसेस तपासणी करूनच समजते यावर ऑनलाईन माहितीची लोकांनी अपेक्षा करु नये. त्यामुळे तर अजूनच घोळ होतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)