आजचा प्रश्न
प्रश्न- लिंगाचा आकार व ते कोणत्या कोनात वाकते यावर स्त्रीची कामपूर्ती ठरते का ?
उत्तर- लिंगाला ताठरता आल्यानंतर लिंग डावीकडे, उजवीकडे, सरळ, तिरके, खालील बाजूस, वरील बाजूस कुठेही झुकू शकते. योनीमार्गातील वरील बाजूस 'जी स्पॉट' नावाचा भाग असतो. ज्याच्या घर्षणाने स्त्रीला कामपूर्ती मिळते. जर पुरुष लिंग वरील बाजूस किंवा खालील बाजूस झुकलेले असेल तर ठराविक आसनांमध्येच स्त्रीला कामपूर्ती मिळू शकते. जरी लिंगाने कामपूर्ती मिळाली नाही तर बोटांचा वापर करून कामपूर्ती देता येते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)