आजचा प्रश्न

प्रश्न- मी शिक्षक आहे. शास्त्रीय लैंगिक शिक्षण देताना कोणती महत्वाची माहिती मुला-मुलींना द्यावी?
उत्तर- शासनाकडून जे तुमचे प्रशिक्षण झाले आहे ते पुरेसे नाही. या व्यतिरिक्त लिंगवर्धक यंत्रातील खोटेपणा, एकतर्फी प्रेम, कामुक चित्रपटातील सत्य/असत्य, वृत्तपत्रातील खोट्या जाहिराती याविषयी माहिती वयात येणाऱ्या मुला-मुलींना लवकरच दिली तर मोठे झाल्यानंतर या गैरसमजांना बळी पडणार नाहीत. हे खऱ्या अर्थाने लैंगिक शिक्षण होईल.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)