आजचा प्रश्न
प्रश्न- तात्पुरता समलिंगी व्यक्ती असतो का? की कायम स्वरूपी असतो?
उत्तर- नोकरी, व्यवसाय, तुरुंग अशा विविध ठिकाणी काही महिने किंवा काही वर्षे रहावे लागते. जर सहकारी व्यक्ती विरुध्दलिंगी नसेल किंवा उपलब्ध होत नसेल तर वाढलेली वासना शमवताना समलिंगी संबंध ठेऊ शकतात. अगदी प्राण्यांमधे देखील दोन नर ५-६ महिने एकत्र ठेवले आणि मादी उपलब्ध नसेल तर नर दुसऱ्या नराबरोबर mating करतो. महिनोंमहिने जहाजावर काम करणारे पुरुष समलिंगी अनुभव घेताना दिसतात. त्यासाठी कंडोम वापरावे असेही त्यांना सांगितले जाते. त्यातले बरेच पुरुष (विवाहित) घरी आल्यावर पुन्हा स्त्रीबरोबर सेक्स करतात. असे पुरुष समलिंगी नसतात तर त्यांची आवड तात्पुरती बदललेली असते.
एडस हा समलैंगिक संबंधांमुळे होतो, हे खरे नाही हे लक्षात असूदे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)