आजचा प्रश्न
प्रश्न- योनीचा आकार मोठा असल्यावर सेक्स करताना शिश्न आत गेले तरी वीर्यपतन होत नाही, योनीमध्ये फिट न बसल्यामुळे असे होते का ?
उत्तर- वीर्यपतन होण्यासाठी ताठरता आलेले लिंग कोणत्या तरी अवयवांना घर्षण केले पाहीजे. योनिमार्गात शिश्न प्रवेश होऊन लिंग लहान असेल, योनी सैल असेल तर घर्षण प्रॉपर होत नाही आणि कडकपणा कमी होऊन वीर्य पडणार नाही किंवा प्रत्येक वेळी कुणाशीही सेक्स करताना किंवा हस्तमैथुन करताना वीर्यपतन होतच नसेल तर ते वीर्यपतन न होण्याची समस्या आहे. तिथे योनिमार्गात घर्षण होते की होत नाही याचा संबंध नसतो. थोडक्यात कोणत्या परिस्थितीत काय घडते यावर निदान उपचार ठरतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)