आजचा प्रश्न

प्रश्न- आपण स्वतः गुप्तरोगावर उपचार करू शकतो का?
उत्तर- पहिले म्हणजे गुप्तरोगाचे निदान करणे तसे अवघड असते. dermatologist डॉक्टर याचे निदान आणि उपचार करतात. जीवाणू, विषाणू बाधा असलेले गुप्तरोग असतात. त्याचे औषध किती काळ घ्यायचे, दुसऱ्याला पसरू नये म्हणून काय काळजी घ्यावी हे डॉक्टर सांगतात. वेबसाईटवरून माहिती घेऊन स्वतः उपचार करणे धोक्याचे ठरते. हृदयरोग, मधुमेह यावर स्वतःच उपचार घेऊन जीवावर बेतलेल्या केसेस आहेत. नपुंसकतेवर देखील वियाग्रा गोळीचा अतोनात वापर, कुठल्याही लैंगिक समस्येवर लोक करतात. हे नक्कीच योग्य नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)